"दगडांचे साम्राज्य"
मनाला फुटत नाही
जरासाही पाझर
कारण तेही झालेय
अच्छिद्र दगड
रस्ते तयार करायला
वापरतात दगड
पैसे मुरवायलाही
लागतोच दगड
पायाभरणीला वापरतात
काळा दगड
मंदिरात जमिनीवर
संगमरवरी दगड
कळसालाही लागतो
दगडच दगड
मूर्ती तयार करायला
हवा अखंड दगड
डोकी फोडायलाही
पुरतो तोच दगड
पुसायलाही कुठे कुठे
वापरतात दगड
विधिमंडळातील चर्चा
निर्विकार दगड
हल्ली माणसाने केलेय
मनालाच दगड
काळजाचाही त्यांच्या
झालाय दगड
माजलेत सगळीकडे
दगडच दगड
सरणावर मडके फोडायला
हवा टोकदार दगड
शेवटी जमिनीत गाडल्यावर
ठेवायलाही हवा दगड
.........
करा विचार आपणही
व्हावे का दगड?
सदानंद पुंडपाळ
सुंदर कविता या दगडांतून देव घडविण्यासाठी तुमच्या शिल्पकार ची गरज आहे
ReplyDeleteतुमच्यासारख्या शिल्पकाराची
ReplyDeleteतुमच्यासारख्या शिल्पकाराची
ReplyDelete