Saturday, 9 April 2016

Tute Napasache Jale

तुटे नापासाचे जाळे

तुटे नापासाचे जाळे,
झाले सारेच मोकळे
शाळांशाळांतून झाले 
पास  सगळे सगळे lध्रुव l
तज्ज्ञ जागे झाले सारे,
शासनाशी जग आली 
सर्वशिक्षण मोहीम ,
शाळा गावोगावी झाली,
पोरं लागली शिकाया 
सारी शाळत शाळत  l१l
पास होतील सगळे,
पत्र शासनाचे आले 
झाले साज्ञानी  समदे,
थेट नववीत गेले 
पोरं नापास कशाने,
न्हाती 'ज्ञानात ज्ञानात'  l२l  
खिचडी खाऊन दुपारी,
मने तरारून जाती 
प्रश्न जुनेच नव्याने ,
ओठी गुरुजींच्या येती 
क्षणभरात पालटे 
चित्र सगळे  सगळे l३l 


No comments:

Post a Comment